Farmer Schemes 2023

Farmer Schemes 2023 :केंद्रशासन आणि राज्य शासनच्या काही महत्वाच्या योजना

Farmer Schemes 2023 केंद्रशासन आणि राज्य शासन हे वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

 • भारत सरकारने ही योजना देशातील जास्तीत जास्त भाग पाण्याखाली यावा पाण्याचा योग्य पद्धतीने पिकांसाठी वापर व्हावा यासाठी सुरू केली आहे.
 • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मुख्यतः शेतकऱ्यांसाठी पाण्याचा स्त्रोत तयार करणे त्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करणे यावर भर देते.
 • केंद्र शासनाने या योजनेत अजून काही योजनांचा एकत्रित करून ही योजना तयार केली आहे.
 • यामधे शेततळे योजना, विहीर योजना, यासारख्या अजून काही योजना एकत्र करून ही योजना भारत सरकार घेऊन आली आहे.

परंपरागत कृषी विकास योजना

 • Farmer Schemes 2023 खूप महत्त्वाची योजना आहे ज्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती असायला हवी.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परंपरागत व सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य दिले जाते.
 • कोरोना काळानंतर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतमालाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
 • ही योजना शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यास मदत करते या योजनेअंतर्गत केंद्र शासन शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य देते.
 • यातून शेतकरी सेंद्रिय खते विकत घेऊ शकतात त्या पिकांना प्रमाणित करणे त्या पिकांचे लायसन्सिंग करणे किंवा पॅकिंग त्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिकवलेला मालनेने आणि त्या मालाचे मार्केटिंग करणे यासाठी करू शकतात.
 • ही योजना मुख्यतः रासायनिक खते कीटकनाशके यांचा वापर कमी करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय व परंपराग पद्धतीने शेती करावी यावर भर देते.
Farmer Schemes 2023

महाबीज बियाणे दर जाहीर

Farmer Schemes 2023 सूक्ष्म सिंचन योजना

 • ही योजना नाबार्ड या बँकेने सुरू केली आहे.
 • यात त्यांनी जवळजवळ 5000 करोड रुपये मागील दोन वर्षात गुंतवले आहेत.
 • या योजनेचे एक उद्देश्य आहे म्हणजेच सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचन तुषार सिंचन यांचा वापर करून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्यांनी मिळवले पाहिजे.

इ-नाम

 • शेतमाल पिकवण्यापेक्षा विकणे हे जास्त अवघड आहे.
 • बरेच शेतकरी म्हणतात शेतमाल आम्ही पिकवू पण तो शेतमाल विकणे हे सर्वात मोठे आव्हान असते.
 • यावरच एक उपाय करण्यासाठी व देशभरातील अनेक वेगवेगळ्या बाजारांना ऑनलाइन जोडण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे.
 • ती म्हणजे इनाम किंवा राष्ट्रीय शेतमालाचा बाजार.
 • या योजनेअंतर्गत देशभरातील जवळपास हजार बाजार एकत्रित जोडले गेले आहेत येथे शेतकरी माल सहजपणे विकू शकतात.
 • इ-नाम या योजनेत शेतकऱ्यांना बाजार जवळ करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत बाजारभावाची माहिती पोहोचवण्याचे काम केले जाते.
 • ही योजना सुरू झाल्यापासून जवळजवळ एक ते दीड कोटी शेतकरी या योजनेची जोडली गेली आहेत.
 • एक ते दीड लाख खरेदीदार आणि 1000च्यावर फार्म प्रोडूसर कंपन्या जोडल्या गेल्या आहेत.
 • म्हणून शेतकऱ्यांनी या योजनेचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे व पिकवलेला माल एका चांगल्या बाजारपेठेत विकला पाहिजे.
Maharashtra Land Right Proofs

महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार

Farmer Schemes 2023 किसान क्रेडिट कार्ड
 • शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीस लागणारे भांडवल वेळेवर आणि गरजेपुरते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 1998 मध्ये ही योजना सुरू केली आहे.
 • या योजनेमार्फत सरकार शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरावर भांडवल उपलब्ध करून देते.
 • या योजनेअंतर्गत पशुपालन, मत्स्यपालन आणि इतर शेती उपयोगी कामांसाठी दीड लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
 • व्याजदर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त कर्जही फेडावे लागत नाही.
मृदा स्वास्थ्य कार्ड
 • Farmer Schemes 2023 या योजनेअंतर्गत शेतकरी जमिनीचे माती परीक्षण दर दोन वर्षांनी खूप कमी शुल्क देऊन करून घेऊ शकतात.
 • यामुळे जमिनीत कोणकोणत्या मूलद्रव्यांची कमतरता आहे कोण कोणती खते वापरली पाहिजेत याबद्दल शेतकऱ्यांना माहिती मिळते.
 • यातून शेतकऱ्यांचा शेतीतील खर्च कमी होण्यास मदत होते व उत्पन्नही वाढते त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती परीक्षण हे नक्कीच केले पाहिजे.
पशु विमा योजना
 • Farmer Schemes 2023 जसा माणसाचा विमा गरजेचा असतो तसा पाळीव प्राण्यांचा सुद्धा विमा काढणे ही खूप गरजेचे आहे.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा विमा काढला जातो.
 • जेणेकरून जर जनावरांची काही हानी झाली तर त्या जनावरांची मोबदला मिळावा म्हणून ही एक महत्त्वाची योजना आहे.

Children Smartphone Addiction 2023 :मोबाइलमुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

Kanda chal anudan 2023 :कांदा चाळ अनुदान वाढले

1 thought on “Farmer Schemes 2023 :केंद्रशासन आणि राज्य शासनच्या काही महत्वाच्या योजना”

 1. Pingback: Government Farmers Schemes :शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजना - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!