अमरावती :
परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो. पण परीक्षा कोणालाच चुकलेली नाही. परीक्षा देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यात कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षा (Online exam) झाल्याने ऑफलाईन परीक्षा (Offline exam) म्हटलं की विद्यार्थ्यांना धडकीच भरते.
विद्यार्थ्यांची लॉटरी |
ऑफलाईन परीक्षा (Offline exam) घेत असल्याने आता विद्यार्थ्यांना टेन्शनच आलं आहे. मात्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मनावरचं ओझं कमी केलं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा (Sant Gadge Baba Amravati University) च्या उन्हाळी परीक्षा 1 जून पासून घेण्यात येणार आहे.
सर्व परिक्षा ऑफलाइन (Offline) होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना कोणतेही प्रश्न सोडविणयाची मुभा देण्यात आली आहे. विद्यापीठात ऑफलाइन परीक्षा (Offline exam) घेण्याची सर्व तयारी विद्यापीठाद्वारे करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटांचा अधिक वेळ प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी देण्यात आलेला आहे. प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी (MCQ) राहतील असे विद्यापीठाने जाहिर केलेले आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार या सवलती (Students will get these concessions) :
प्रश्न पत्रिकेत विचारलेले पर्यायी प्रश्न देखील सोडवू शकतात. दोन्हीही प्रश्नांचं मूल्यमापन होणार आहे.
एकूण जर 160 गुणांची प्रश्नपत्रिका असेल तर 80 गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवणं बंधनकारक असनार आहे.
विद्यार्थ्यांना 15 मिनिटं जास्त वेळ मिळणार आहे.