Bael Juice Benefit : उन्हाळ्यात बेल फळाचा ज्युस पिल्याने होतात जबरदस्त फायदे, बघा नैसर्गिक आणि रामबाण उपाय…

 Bael Juice Benefit In Summer : 

                       उन्हाळ्यात बेल ज्यूस हे खूप फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाने तुम्हाला जास्त उष्णता जाणवणार नाही. याशिवाय उष्णतेपासून वाचण्यासाठी देखील हा रामबाण उपाय आहे. यासोबतच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून ते रक्त साफ करण्यासाठी बेलचा रस देखील खूपच उपयुक्त आहे. याशिवाय बेल ज्यूस पिण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

Bael Juice Benefitप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity becomes stronger)

                   जर तुम्ही उन्हाळ्यात बेलचा रस पिलात तर तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होईल. चांगली प्रतिकारशक्ती शरीराला रोगांशी लढण्यास सक्षम करत असते. प्रथिने(Protein), बीटा-कॅरोटीन(Beta-carotene), थायामिन(Thiamine), रिबोफ्लेविन(Riboflavin) आणि व्हिटॅमिन सी(Vitamin C) सारखी पोषक तत्वे बेलच्या रसात आढळतात.


रक्त शुद्ध करते(Purifies the blood)

                   बेलचा रस रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील खूपच फायदेशीर आहे. जरी रक्त स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारची औषधे  उपलब्ध आहेत, तरी बेलाचा रस हा एक नैसर्गिक पर्याय आहे, जो तुम्ही अवलंबू शकतात.


हृदयरोगात फायदेशीर(Beneficial in heart disease)

            याशिवाय बेलच्या रसात तूप मिसळून काही प्रमाणात सेवन केले तर त्याचा देखील फायदा दिसून येतो. यामुळे हृदयाचे आजारही दूर राहतात. म्हणजेच हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.


महिलांसाठीही फायदेशीर (Also beneficial for women)

           बेलाच्या रसाचे सेवन महिलांसाठी खूपच फायदेशीर ठरते. खरं तर, ते स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण करत असते. यासोबतच स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी देखील बेलचा रस हा उपयुक्त आहे. त्याच्या सेवनाने आईचे दूध हे वाढत असते.


तुम्ही बेलचा रस कधी पिऊ शकता?

           तुम्ही सकाळी किंवा दुपारी रिकाम्या पोटी कधीही बेलचा रस पिऊ शकतात, परंतु लक्षात ठेवा की खाल्ल्यानंतर किंवा चहा-कॉफी घेतल्यानंतर लगेचच बेलचा रस पिऊ नये. कारण असे केल्याने फायद्याऐवजी तोटेच होऊ शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!