Parbhani Jintur Miltry Girl : देशाच्या संरक्षणात ग्रामीण भागातील मुली कमी नाहीत हे परभणीच्या जिंतुर या तालुक्यातील दुर्गम अशा सावरगाव येथील शिल्पा भुतकर या 22 वर्षीच्या तरुणीने दाखवून दिले आहे. शिल्पाची देशाच्या सीमा सुरक्षा बलात निवड झाली असून ती जिंतूूर तालुक्यातील पहिलीच मिल्ट्री गर्ल बनण्याचा बहुमान तिनं पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल सावरगाव आणि सावरगाव तांडा येथील सर्व ग्रामस्थांनी तीच जंगी स्वागत केलं आहे.
शेतकऱ्याची लेक सीमा सुरक्षा बलात; परभणीच्या जिंतुर या तालुक्यातील पहिलीच ‘मिल्ट्री गर्ल’, गावात तिचे जंगी स्वागत झाले… |
जिंतूर तालुक्यामधील सावरगाव येथील शिल्पा मोकिंद भूतकर ही मुलगी वयाच्या 22व्या वर्षी सीमा सुरक्षा बल (Border Security Force) दलात पात्र ठरली आहे. तिने भोपाळ येथे सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असून ती बिहार-नेपाळ च्या सीमेवर रुजू झाली आहे. सीमा सुरक्षा बल (Border Security Force) दलात महिलांमधुन पात्र ठरलेली ती जिंतूर तालुक्यातील पहिलीच मुलगी आहे.
शिल्पाचे वडील शेती करतात आणि तिची आईने धुणी-भांडी करण्याचे काम करते. अशा परिस्थितीमध्ये शिल्पाने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिल्पा भूतकर हिचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे नाशिक येथे झाले असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मजुरी करून तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलेले आहे.
शिल्पाने पदवी पर्यंत शिक्षण घेतलेले असून सन-2021 च्या सीमा सुरक्षा बल पात्रता परीक्षेत (Border Security Force Eligibility Test) ती उत्तीर्ण झाली होती. या स्पर्धेत जवळपास दीड लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. जिंतूर तालुक्यातील ती पहिलीच ‘महिला मिल्ट्री गर्ल’ ठरली असून सर्व क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावच होत आहे.
तिच्या या यशामुळे गाव आणि परिसरातील मुलींना प्रेरणा उत्तम मिळाली असून मुली देखील देशाच्या संरक्षणासाठी अग्रेसर आहेत हे तिने दाखवूनच दिले आहे. गावकऱ्यांच्या वतीने संपूर्ण गावातुन मिरवणूक काढून तिचे जंगी स्वागत करण्यात आले आहे, यावेळी सावरगाव आणि तांड्यातील शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते.