पेट्रोल स्वस्त झाल्यानंतर पुन्हा मोठी खूशखबर; खाद्य तेलांच्या दरात मोठी घसरण

 नवी दिल्ली: Mustard Oil Price | महागाईबाबत केंद्र सरकार (Central Government) ने सर्वसामान्य लोकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकार (Central Government) ने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर आता आणखी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता कच्च्या घाणीच्या तेला (Crude oil) त मोठी घसरण झाली आहे. इंडोनेशियाने पुन्हा निर्यात सुरू केल्या कारणाने किमतीत घट झाली आहे.


Cooking oil price: खाद्य तेलांच्या दरात मोठी घसरण
इंडोनेशियातून पुन्हा निर्यात सुरू

          परदेशी बाजारपेठे (Overseas markets) त खाद्यतेलाच्या दरात वाढ होत असताना, इंडोनेशियातून निर्यात सुरू झाल्याचा परिणाम आपल्या देशाच्या बाजारपेठेवर झाला आहे. गेल्या आठवड्यात बहुतांश तेल-तेलबियांच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. परिणामी मोहरीचे तेल (Mustard oil)  40 रुपयांनी स्वस्त झाले आहे. खाद्यतेलाच्या दरातील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.


मोहरीच्या दरात देखील 100 रुपयांची घसरण 

           मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मोहरीच्या तेलाचा भाव 100 रुपयांनी घसरून 7,515-7,565 रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. त्यामुळे मोहरी दादरी तेल (Mohri Dadri Oil) क्विंटलमागे 250 रुपयांनी घसरून 15050 रुपये झाले आहे.


            मागील आठवड्यात परदेशातील बाजारातील वाढीव किंमतीमुळे कच्च्या पाम तेलाचे भाव देखील 500 रुपयांनी घसरून 14,850 रुपये प्रति क्विंटल, पामोलिन कांडला (Palmolin Kandla) 520 रुपयांनी घसरून 15,200 रुपये झाले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!