घराजवळ ‘या’ पद्धतीनं तुळशीचं रोपटं ठेवणं आहे चुकीचं, तुम्ही देखील हीच चुक करत असाल, तर मग लगेच सुधारा


   तुळस हे लक्ष्मी मातेचे रूप असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर अनेक लहान-मोठे सण किंवा धार्मिक कार्यक्रमातही तुळशीची विशेष पूजा केली जाते.

       

          आपल्याकडे तुळशीला विशेष असे महत्त्व आहे. तुळशीचे रोप बहुतेक सर्वच घरांमध्ये आढळते, त्यामागे अनेक कारणे आहेत. अनेक घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाची पूजा देखील केली जाते. तुळशीच्या रोपाला आयुर्वेदात फार महत्व आहे. तुळस अनेक आजारांवर उपयुक्त औषधी आहे. शास्त्रानुसार तुळशीचे रोप येणाऱ्या काळाचे काही संकेत देते असते. तसेच वास्तुशास्त्रात अशी अनेक झाडे आहेत, जी घरातील दोष दूर करण्यास मदत करत असतात. असे म्हटले जाते की, घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक उर्जा मिळत असते. चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या रोपावरुन घरात घडणाऱ्या गोष्टीचा कसा संबंध लावला जातो.


            असे म्हटले जाते की, तुळशीचं रोपटं हे बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असते. कार्तिक महिन्यातील देवूथनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाचा विवाह भगवान विष्णूच्या रूपात असलेल्या शालिग्रामसोबत केला जातो. तुळस हे श्री लक्ष्मी मातेचे रूप असल्याचे देखील मानले जाते. त्याचबरोबर अनेक लहान-मोठे सण किंवा धार्मिक कार्यक्रमात देखील तुळशीचीच विशेष पूजा केली जाते.             असे मानले जाते की तुळशीचे रोप अचानक सुकणे हे घरात संकट येण्याचे संकेत आहेत. याचाच अर्थ असा होतो की भगवान श्री हरी विष्णू तुमच्यावर कोपले आहेत.


           वास्तुशस्त्रानुसार तुळशीची पाने अचानक पडणे ही देखील अशुभ मानले जाते. पितृदोषामुळे अनेक वेळा तुळशीचे रोप सुकते आणि त्यामुळे जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. असंही मानलं जातं की घरात सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून होणारे भांडण हे पितृदोषाचेच एक कारण असू शकते.


       असे मानले जाते की, जर तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाजवळ जर पक्षी घरटे बनवत असेल तर याचा अर्थ तुमच्या कुंडलीतील केतूची स्थिती बिघडलेली आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना देखील केल्या जातात.


          तसेच घराच्या छतावर तुळशीचे रोप ठेवले तर बुध ग्रह कमजोर होतो. असे म्हटले जाते की बुध ग्रह हा धनाचा ग्रह आणि व्यवसायाचा स्वामी आहे. त्यामुळे त्याला नेहमी तुमच्या घरासमोर ठेवा घराच्या वर कधीच ठेऊ नये. 

तुळशीच्या रोपाशी संबंधित उपाय


– एकादशी आणि रविवार सोडून इतर प्रत्येक दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे, असेही सांगितले जाते.


– असे मानले जाते की तुळशीच्या रोपाची दररोज नित्य पूजा केली तर सर्व संकटे दूर होतात.


– सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवे दाखवावेत असे देखील सांगितले जाते.


– घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर त्याची काळजी घ्या आणि त्याला वेळोवेळी पाणी द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!