गाेरक्षकांनी पकडली गाडी ; कत्तलीसाठी जाणाऱ्या १४ गायींची सुटका

                लासलगाव पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. आदिनाथ कोठुळे, पोलीस कर्मचारी योगेश शिंदे, संदीप शिंदे खेडलेझुंगे येथे हजर झाले आणि या पीकअप गाडीतील 4 गोवंश तसेच आश्पाक राजू शेख व अल्ताफ जमील शेख दोन्ही राहणार कुरण ता. संगमनेर या दोन्ही गुन्हेगारांना पीकअप गाडीसह ताब्यात घेतले.

लासलगाव : कत्तलीसाठी 4 गोवंशाला घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडीला निफाड तालुक्यातील गोरक्षकांनी वेळीच पकडल्या करणाने या जनावरांचे प्राण वाचवले.                 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खेडले झुंगे या रस्त्याने सोमवार दि. २८ रोजी रात्री १२.४५ वाजेच्या दरम्यान संगमनेर येथे कत्तलीसाठी 4 गोवंशाला दोघे जण पीकअप क्र. एम एच १५ सी के १०४९ या गाडीतून घेऊन जात असल्याची माहिती निफाड तालुक्यातील गोरक्षकांना मिळाली होती.

           

              या घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद जिल्हा सदस्य संतोष केंदळे, लासलगाव संयोजक शुभम बोराडे, बजरंग दल निफाड तालुका अध्यक्ष सुरज नाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिराग जोशी, अभिजीत जाधव, विंचूरचे कोळपकर खेडलेझुंगे येथे हजर झाले आणि या पीकअप गाडीला अडवून गाडीतल्या जनावरांबाबत विचारपूस केली असता या दोन्ही गुन्हेगारांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती. यावेळी पिकप गाडीतील गोवंश अतिशय वाईट परिस्थितीत गाडीत बांधून कत्तलीसाठी जात असल्याचे आढळून आले होते.  

               या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. आदिनाथ कोठुळे, पोलीस कर्मचारी योगेश शिंदे, संदीप शिंदे खेडलेझुंगे येथे हजर झाले आणि या पीकअप गाडीतील 4 गोवंश तसेच आशपाक राजू शेख आणि अल्ताफ जमील शेख दोन्ही राहणार कुरण ता. संगमनेर या दोन्ही गुन्हेगारांना पीकअप गाडीसह ताब्यात घेतले व लासलगाव पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध जनावरांची अवैधरित्या वाहतूक करण्याचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला होता. रविवारी रात्री उशिरा या 4 ही गोवंशाना लासलगाव येथील गोरक्ष प्रतिक चोथानी यांच्या खळ्यावर सुखरूप उतरवण्यात आले आणि नंतर विंचूर येथील डॉक्टर केकान यांनी जखमी गोवंशावर उपचार केले. या घटनेतील पुढील तपास स.पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.उ.नि. लहानू धोक्रट करत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!